अनुसूचित जातीतील योजना छायाचित्र प्रदर्शनीस जिल्हा रासेयो स्वंवसेवकाची भेट, डीआईओ अंजू कांबळे यांनी साधला संवाद

488 Views

 

गोंदिया। अनुसूचित जातीतील घटकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष पात्र नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी
नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनीस जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वंयसेवक यांनी भेटी देवून माहीती जाणून घेतले.
या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त (सामाजिक न्याय) किशोर भोयर, तहसीलदार समशेर पठाण, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा सम्नवयक प्रो. डाँ. बबन मेश्राम,पत्रकार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकार व एन. एम. डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डाँ. बबन मेश्राम यांनी विद्यार्थीशी संवाद साधतांना छायाचित्र प्रदर्शनी मध्ये एकूण 46 योजना लावण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शासकीय निवासी शाळा, भारत सरकारची मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती, सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मिनी ट्रॅक्टर योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, कन्यादान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अशा विविध योजनांचे प्रदर्शनी दालन असल्याचे सांगून सविस्तर माहिती देवून विद्यार्थी चे समाधान केले.
हे प्रदर्शन बुधवारपासून सुरू झाले असून शुक्रवार पर्यंत असणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठीची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.
तेव्हा गोंदिया जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी अनुसूचित जातीतील घटकांसाठी च्या प्रदर्शनीचा लाभ उचलावा असे, आवाहन सहायक आयुक्त किशोर भोयर आणि जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी केले आहे.

पथनाट्यातून लोकजागृती
विक्रम फडके यांच्या असर फाउंडेशनच्यावतीने लोककलाकारांनी पथनाट्य सादर करून अनुसूचित जातीतील घटकांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. मनोरंजनातून दिलेल्या या संदेशामुळे उपस्थित नागरिकांना योजनांची माहिती प्रभावीपणे समजली. तसेच येथे 360 अंश फिरणारा सेल्फी स्टँडही ठेवण्यात आल्या आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी केली, तर सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

Related posts