गोंदिया : शास्त्री वार्ड गोंदिया निवासी दिपेश महेन्द्र सोनेवाने यांनी हिमालयातील पर्वतरांगेच्या उत्तरकाशीत असणाऱ्या माचाधार पर्वताच्या हुर्रा पाँईटवर जाऊन तिरंगा फडकविला . ज्याची उंची 15500 फुट आहे. उत्तराखंडातील उत्तरकाशी स्थित नेहरू इंस्टीट्यूट ऑफ माउंटेनियरींग मध्ये माउंटेनियरींग च्या विशेष प्रशिक्षण त्याने भाग घेतला होता त्याचे प्रशिक्षण ३० दिवसाचे होते . या प्रशिक्षण काळात कठिण व बर्फाने झाकलेल्या डोरियानी ग्लेशियर वर त्यांनी १२ दिवस काढले .
मायनस डिग्रीत राहून चॅलेंज स्विकारुन हे माऊंटेनियरींग चे प्रशिक्षण दिपेश ने पूर्ण केले . त्याला लहानपणापासूनच पर्वत चढण्याची फार हौस होती . व ती त्याने पूर्ण केली . दिपेश सोनेवाने याने डी. बी. सायन्स कॉलेज गोंदिया मधून बी.सी.ए. ची पदवी मिळविली आहे . त्याने महाराष्ट्राचे व भारताचे सर्वात उंच शिखर गाठण्याचे स्वप्न बाळगले आहेत . त्याला आपल्या जीवनात ते पूर्ण करायचे आहेत .
दिपेश ने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना व मित्रांना दिले आहे . त्याच्या या यशस्वी अभियानासाठी सर्वत्र कौतुक होत आहेत .
जयंत मुरकूटे, रतीराम भांडारकर, मंगेष सोनेवाने, श्रुति सोनेवाने, स्नेहल सोनेवाने, श्रीकांत चुटे, अनिता मुरकूटे , संतोष भांडारकर, संजय आसटकर, रुपचंद रामटेककर, जयेश मुरकूटे, संतोष भांडारकर, भोजराज रणदिवे , दिनेश रामटेककर , संजय मुरकूटे , मनोज सोनेवाने , सुनिल तिवारी, राजेश कापसे, राजकुमार कुथे, शैलेश निकोडे, पराग पटले, गोकूल परदेशी, ओमप्रकाश गुप्ता, सविता बेदरकर, ज्योती परदेशी, कुसुम पुसाम, वशिष्ठ खोब्रागडे, नरेश रहिले, एम.ए.ठाकुर, रेवाराम सोनवाने, जयश्री सिरसाटे , सुभाष मारवाडे इत्यादींनी त्याचे खुप खुप अभिनंदन केले. तसेच या उत्साहात त्याचे मित्र नातेवाईक या सर्वानी त्याचे कौतूक केले. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .