राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या विचारधारेवर काम करणारा पक्ष- मा. आमदार राजेन्द्र जैन

320 Views

तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता बैठक संपन्न

प्रतिनिधि।
तिरोडा: आज जिल्हा परिषद क्षेत्र वडेगा़व, तालुका तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची कार्यकर्ता बैठक श्री नेहरू सहकारी भात गिरणी वडेगाव येथे माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
कार्यकर्ता बैठकीला मा. आ. राजेंद्र जैन संबोधतांना म्हणाले की, कार्यकर्त्यांनी खासदार श्री प्रफुल पटेल यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचवावे, सामान्य लोकांचे छोटे, छोटे कामे असतात ते पुर्ण केल्यास पक्षाचा विस्तार होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या विचारधारेवर काम करणारा पक्ष आहे. हा विचार प्रत्येक घरी पोहचविण्याचा प्रयत्न करावा.
श्री विजय शिवनकर म्हणाले की, जि.प.पर्यवेक्षक व बुथ प्रमुखांनी समन्वय साधून गावात बैठका लावाव्यात सोबतच जिथे पक्ष कमकुवत वाटत असेल तेथे पक्ष बांधणी करण्याचे काम करावे.  यासोबतच विविध विषयांवर व पक्ष संगठन बद्दल चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, डॉ. अविनाश जैस्वाल, कैलास पटले, अजयसिंग गौर, योगेंद्र भगत, ओमकार लांजेवार, मनोज डोंगरे, राजू एन जैन, संभाजी ठाकरे, विनाताई बिसेन, टूडीलाल शरणागत, सुनीता मडावी, जयाताई धावडे, मंजुळाबाई लांजेवार, डॉ. किशोर पारधी, निताताई रहांगडाले, रोशन बागडे, नेपालचंद भास्कर, जितेंद्र पारधी, किरण बंसोड, संदीप मेश्राम, वा. टी. कटरे, नासीर धानीवाला, देवेंद्र चौधरी, मनोहर राऊत, राजू ठाकरे, धानसिंगभाऊ बघेल, सिद्धार्थ कावळे, सीमाताई वासनिक, कीर्तीताई रहांगडाले, लक्ष्मीताई ठाकरे, संतकलाबाई पंधरे, अरुणाबाई परतेती, निर्मलाताई गौतम, मुकेशभाऊ भांडारकर, भारतभाऊ रहांगडाले, रणजित वालदे, सिद्धार्थ नंदेश्वर, भिवरावसोयाम, लखन रहांगडाले, डॉ. योगेंद्र पटले, चंदबाई शर्मा, सुरेश बरीकर, डॉ. अनिल पटले, शिवीरकुमार चोले, जीवन गौतम, हिरानंद ठाकरे, प्रमिलाबाई टेम्भेकर, प्रकाश रहांगडाले, नीलकंठ बिसेन, किशोर ठाकरे, मीनाक्षीताई जगणे, ओमप्रकश रहांगडाले, मधुकर दहीकर, राधेश्याम पटले, उल्हास रहांगडाले, लखन बघेले, मुकेश पटले, रमेश सोनवाने, कांतीलाल चौरागडे, माणिकराम बिसेन, कमलचंद ठाकरे, दिनेश सिडामे, प्रमिलाताई उके, सुधाकर मेश्राम, रवींद्र भगत, डॉ. श्याम रहांगडाले, तेजराम टेम्भरे, बबलू पारधी, रमेश भगत, भुवनेश्वर पटले, भाऊराव रहांगडाले, टल्लूराम पारधी, नासीर धुर्वे, विजय इडपाते, बंडूभाऊ मारबते, शरद बांते, दुर्गेश कळपती, अशोक हरडे, अनमोल नंदुरकर, युवराज शहारे, बाळू उके, चुन्नीभाऊ रहांगडाले, पावन पारधी,मी सैय्यद काकाजी, शरद बांते, प्रमोद पटले, रमेश पटले, शुभम पारधी, राजुभाऊ केळकर, छनेश माहूरकर, राजकुमार रोगडे, संजय रहांगडाले व सर्व बूथ पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts