गोरेगांव: डांबरीकरण रस्ता, नाली व पेविंग ब्लॉक बांधकामाचे आ. रहांगडाले यांचे हस्ते भूमिपूजन थाटात संपन्न..

178 Views

बांधकाम होत असलेल्या रस्त्यामुळे आता लोकांचे त्रास कमी होणार- पूर्व नपं अध्यक्ष इंजी. आशीष बारेवार

प्रतिनिधि:18 सेप्टेंबर
गोरेगांव। तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते दिनांक 17 सप्टेंबर 2021 ला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन 2019 20 मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत मंजूर केलेल्या निधीमधून दुर्गा चौकातील देवाजी रहांगडाले ते जगात कॉलेज व जगत कालेज ते रेल्वे स्टेशन अशा या डांबरीकरण रस्ता, नाली व पेविंग ब्लॉक बांधकाम चे भूमिपूजन आज थाटात संपन्न झाले।
 या कार्यक्रमाला आमदार विजय राहंगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन फलकाचे अनावरण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली। तसेच हा रस्ता खूप दिवसापासून शहरवासीयांसाठी त्रासाच्या बनला होता। वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये याची दयनीय अवस्था प्रकाशित होत होती याचे बांधकाम करण्यासाठी वेळोवेळी या प्रभागातील लोकांनी नगरपंचायत व नगराध्यक्ष यांच्याकडे मागणी केली होती। याचाच अनुसरून करुण माजी नगराध्यक्ष इंजी. आशीष बारेवार यांनी आपल्या काळात हे कार्य मंजूर करून घेतले व आमदार विजय राहंगडाले यानी तत्कालीन शासना कडून निधि मंजूर करुण आनला होता.
त्याचे प्रत्यक्ष बांधकाम आज सुरू झाले तरी या बांधकाम होत असलेल्या रस्त्यामुळे आता लोकांचे त्रास कमी होणार आहे व वाहतुकीकरिता चांगल्या प्रकारचा एक रस्ता तयार होत आहे. या साठी प्रभाग वासियांनी आभार मानले आहे.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माजी सभापती लक्ष्मीकांत बारेवार, रेखलाल टेंभरे-बैंक डायरेक्टर, नप माजी उपाध्यक्ष सुरेश राहंगडाले, नप माजी सभापती रेवेंद्र बिसेन, भाजपा गटनेता हिरालाल रहांगडाले, साहेबलाल कटरे, इसुलाल सोनवाने, मोरेश्वर कांबळे, मोरेश्वर रहांगडाले, हिदा येडे गुरुजी, सोनम येडेकर, मुन्नालाल बावनकर, नन्हू जी रहांगडाले, श्री  दिगंबर बारेवार, संतोष रहांगडाले व इतर शहरातील मान्यवर उपस्थित होते।

Related posts