गोरेगांव शहरातील मोक्षधाम येथे मोक्षधाम सेवा समिती पांगोली घाट गोरेगाव च्या वतीने श्रमदानातून स्वच्छता अभियान व झाडांना टिगार्ड

248 Views

 

प्रतिनिधि।

गोरेगाव। शहरातील मोक्षधाम परीसरात गेल्या आठवड्यात मोक्षधाम सेवा समिती च्या वतीने लावलेल्या झाडांना आज दि. 22 आॅगष्ट रोजी रविवारी झाडाना टिगार्ड लावण्यात आले. सोबतच श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

दोन आठवड्यांपूर्वी मोक्षधाम सेवा समिती च्या वतीने 11 पिपळांची झाडे लावण्यात आली होती. यातील दोन झाडे काही समाजकंटकानी उपटून फेकली, असे समाजघातकी काम करणा-या व्यक्तीचे समिती च्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

स्वच्छता मोहीम व टिगार्ड लावल्यानंतर समिती ची मोक्षधाम परीसरात सभा घेण्यात आली. या सभेत विविध विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

आज रविवारी मोक्षधामाच्या उत्थानासाठी शहरातील गणमाण्य नागरीक सेवाभावी वृत्ती जोपासत ऐकवटले होते. यावेळी मोक्षधाम सेवा समिती चे अध्यक्ष रेखलाल टेभंरे, उपाध्यक्ष रेवेद्रकुमार बिसेन, सचिव फत्तेसिग सग्गू,सहसचिव सतीश पारधी, कोषाध्यक्ष आशिष बारेवार , कार्याध्यक्ष संजय बारेवार , सदस्य अंकित रहागङाले , दिपक रहागङाले, प्रमोद कटरे सर, ओमप्रकाश बिसेन प्रचार व प्रसिद्धी प्रमुख दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी मोक्षधाम सेवा समिती चे अध्यक्ष रेखलाल टेभंरे यांनी समितीच्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. संचालन अंकित रहागङाले व आभार सतीश पारधी यांनी मानले.

Related posts