गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका आढावा बैठक संपन्न, पक्षा च्या वतीने स्व.प्रदिप जैन यांना श्रद्धांजली

149 Views

 

गोंदिया। आज गोरेगाव येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. आढावा बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी खासदार श्री खुशाल बोपचे, जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.

प्रमुख उपस्थितीतानी पक्ष संघटना व येणा-या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्तांनी कामाला लागावे असे आवाहन केले. याप्रसंगी गोरेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय प्रदीप जैन यांचे दिनांक 31 जुलै ला दुःखद निधन झाले. त्या औचित्याने आज स्व.प्रदीप जैन यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वश्री राजेंद्र जैन, खुशाल बोपचे, मनोहरराव चद्रिकापुरे, विजय शिवणकर, उत्तमचंद जैन, विशाल शेंडे, राजू एन जैन, सोमेश्वर रहांगडाले, रविकांत बोपचे, रुस्तम येडे, बाबा बोपचे, विवेक शेंडे, श्रीप्रकाश रहांगडाले, बाबा बहेकार, अनिता तुरकर, कमलेश बारेवार, कल्पनाताई बहेकार, खुशाल वैद्य, रूपसेंन बघेले, लालचंद चव्हाण, दिलीप चव्हाण, कृष्ण्कुमार बिसेन, नरेश खोहदे, आनंद बडोले, बिसेनजी, अर्चना चौधरी, उषाताई रामटेके, नितेश येल्ले, रामभाऊ अगडे, गेंदलाल शेवटे, अंजुताई अगडे,कल्पना शेवटे, रंजनाताई बारेवार, रुपेश गौतम, टेकेश रहांगडाले, कुंदा खुटमुळे, चोकलाल येडे, सतनाम राऊत, आर.बी. कटरे, प्रतीक पारधी सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts