गोंदिया: पालकमंत्री नवाब मलिक 14 व 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

477 Views
      गोंदिया,दि.12 : पालकमंत्री नवाब मलिक हे 14 व 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता मुंबई येथून खाजगी विमानाने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या समवेत चर्चा. दुपारी 2.20 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अग्नीशमन सेवा व बळकटीकरण योजनेअंतर्गत तीन नगरपंचायतींना मिळालेले अग्नीशमन वाहनांचा लोकार्पण सोहळा. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2020-21 व सन 2021-22 संदर्भात जिल्हास्तरीय समितची बैठक. दुपारी 2.50 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात वनहक्क पट्टे वाटप कार्यक्रम. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा. दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद. सायंकाळी 5.30 वाजता एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा. सायंकाळी 7 वाजता विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव-मुक्काम.
         15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा,गोंदिया येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभनिमीत्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक. सकाळी 10.30 वाजता नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक,गोंदिया येथे रानभाजी महोत्सवास उपस्थिती. सकाळी 11 वाजता गोंदिया येथून मोटारीने भंडारा मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील.

Related posts