गोंदिया: अद्यापही ओबीसी समाजाचा मागासलेपणा कायम, ओबीसींनी आतातरी जागृत व्हावे- बबलू कटरे

288 Views

 

ओबीसी समाजातील थोरमहात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ‘मंडल दिवस’ साजरा

प्रतिनिधि।

गोंदिया,दि.07 : देशात बी.पी. मंडल आयोग ७ ऑगस्ट १९९० ला लागु झाला. हा आयोग देशात लागु करणारे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग हे ओबीसींचे उध्दारक आहेत, ट्ठसे असले तरी त्यानंतरच्या शासनाने ओबीसींच्या सुखसोयीकडे दुर्लक्ष केले. परिणामी आज ओबीसी समाज शैक्षणिक, राजनैतिक व आर्थीक द्रष्ट्या मासला आहे. तेव्हा आता खर्‍या अर्थाने ओबीसींनी जागृत होवून आपल्या अधिकारासाठी लढण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलु कटरे यांनी माडले.

आज ७ ऑगस्टला स्थानिक कटंगी येथील मयुर लॉन्स सभागृहात ‘मंडल दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ओबीसींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ओबीसी समाजातील थोरमहात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. बी. पी. मंडल व सर्व महापूरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलु कटरे होते. प्रमुख वक्ता म्हणून विचारवंत अ‍ॅड. नामदेवराव किरसान, कार्याध्यक्ष अमर वराडे, विनोद हरिणखेडे, गुरूदास येडेवार, राजेश नागरिकर, पकंज यादव, ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, संदिप तिडके, मनोज डोये, एस.यु. वंजारी, प्रा.सविता बेदरकर, लक्ष्मण नागपूरे, डाॅ.गुरुदास येडेवार, प्रा.डि.एस.मेश्राम, दिनेश हुकरे आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी ओबीसी नेते बबलु कटरे म्हणाले की मंडल दिवसाचे औचित्य साधुन ओबीसी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून अनेक मागण्यांचा पाठपुरावा केला व बर्‍याच मागण्या ओबीसींच्या पदरात पाडून घेता आल्या. ओबीसींच्या मागण्या घेवुन जिल्ह्यासह राष्ट्रायी पातळीवरील आंदोलनात सहभागी होत समाजात जनजागृतीचे काम करण्यात आले आहे.परंतु अद्यापही ओबीसी समाजाचा मागासलेपणा कायम आहे. म्हणुन ओबीसींनी जागृत राहून ओबीसींसाठी राष्ट्रीय स्तरावर कोण काम करत आहे व काय मिळत आहे, याकडे बघावे. तथा राष्ट्रीय स्तरावरील संघटनेसोबत जुडून ओबीसींचा लढा बुलंद करावा, असे आवाहन बबलु कटरे यांनी केले आहे. अनेक मान्यवरांनी यावेळी आता जनगणना सुध्दा केंद्र सरकारने करावी या लढाईसाठी ओबीसींनी तयार रहावे, असे वक्तव्य केले.

यावेळी ओबीसींचा लढा अधिक तीव्र करावा जेणेकरून केंद्र शासनाकडून ओबीसींची जनगनला करेल अशी भुमिका घेण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून ओबीसींचे क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, संविधानात नमुद शैक्षणिक दृष्ट्या ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, त्यातच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत संपुष्टात आलेले ओबीसींचे आरक्षणही यथावत करण्यात यावे, यासह शेतकर्‍यांसाठी गठीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागु करण्यात याव्या, आदि विविध मागण्यांना घेवून या अधिवेशनात चर्चा करण्यात आली.

गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद, ओबीसी कर्मचारी महासंघ, ओबीसी जनमोर्चा यांच्या संयुक्त रूपाने मंडल दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला उमेंद्र कटरे, विनोद चौधरी, कैलाश भेलावे, सुनील भोंगाडे,अतुल सतदेवे, पुष्पाताई खोटेले, उषाताई मेंढे, विमल कटरे,ममता राणे, गणेश बरर्डे, तिर्थराज उके, अशोक लंजे, जितेंद्र कटरे, डॉ. संजीव रहांगडाले, प्रकाश पटले, वाय.टी. कटरे,शिशिर कटरे, ओम पटले,रवी भांडारकर,मनोज शरणागत,राजीव ठकरेले,महेंद्र बिसेन,भुमेश शेंडे,सुनिल भरणे,राजू काळे,विनायक येडेवार,हरिष ब्राम्हणकर,चौकलाल येळे,वंदना काळे,पप्पू पटले,डाॅ.एल.एच.तुरकर,रमेश ब्राम्हणकर,मुुकेश उजवणे,रोशन बडोले,गौरव बिसने यांच्या सह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुनील पटले यांनी केले.

Related posts