भाजप ने ठोकलें जिला पणन कार्यालयाला कुलूप, शासनाकडे शेतकर्‍यांना बोनस देण्यास पैसे नसतील तर कार्यालय विकून तो खर्च केला जावा- आ. डॉ. परिणयफुके

284 Views

 

भंडारा, 02 जुलै
शेतकऱ्यांचा थकित बोनस आणि संपूर्ण धानाची उचल करण्यात यावी या मागणीला घेऊन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले. या आन्दोलनाचे नेतृत्व माजी पालकमंत्री व आमदार डॉ. परिणय फुके, खा. सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे आणि किसान आघाड़ीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात कोरोना काळातही शेकडोंच्या संख्येत शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

धान्य उत्पादनासाठी ओळखल्या जात असलेल्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना शासन कर्त्यांकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचे धानाचे थकित असलेले बोनस चे पूर्ण पैसे त्वरित देण्यात यावे, धानाची भरडाई तात्काळ केली जावी व शिल्लक असलेला सर्व धान खरेदी केला जावा मागणीसाठी आंदोलन केले गेले.

जिल्हा पणन कार्यालयापासून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर पणन अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून त्याची किल्ली जिल्हाधिकार्‍यांच्या सुपूर्द करण्यात आली. शासनाकडे शेतकर्‍यांचा बोनस देण्यास पैसे नसतील तर कार्यालय विकून तो खर्च केला जावा अशी उपहासात्मक मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे- आ. डॉ. फुके

आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका भाजपने घेतली असून त्यांना त्यांचा अधिकार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी आक्रमक भूमिका ही घेण्याची आमची तयारी आहे, असे आमदार परीणय फुके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

खासदार सुनील मेंढे म्हणाले शेतकऱ्यांची दिशाभूल करून फार काळ राजकारण केले जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना गरज असताना त्या वेळेवर जर मदत मिळत नसेल तर शेतकरी नेते म्हणून मिळविण्याचा अधिकार तुम्हाला नाही. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नागवीने बंद करावे. नाही तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढेल असा इशारा यांनी यावेळी बोलताना दिला.

आंदोलनात किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, माजी खासदार शिशुपाल पटले, ब्रह्मानंद करंजीकर नेपाल रंगारी संजय कुंभलकर, राजेश बांते, जिल्हा महामंत्री हेमंत देशमुख, चैतन्य उमाळकर, विलास काटेखाये, प्रदीप पडोळे, महेंद्र निंबार्ते, विनोद बांते, मधुरा मदनकर, साधना त्रिवेदी यांच्यासह अनेक भाजपाचे पदाधिकारी उपस्थित. मोर्चात जिल्हाभरातून आलेले शेतकरी आणि कार्यकर्ते शेकडोच्या संख्येत सहभागी झाले होते. कोरोना काळातही आंदोलनातील लोकांचा सहभाग पाहता मागण्यांची तीव्रता लक्षात येते.

Related posts