गोंदिया: पालकमंत्री नवाब मलिक 25 व 26 जूनला जिल्हयात

484 Views

 

गोंदिया। पालकमंत्री श्री नवाब मलिक हे 25 व 26 जून दोन दिवसीय जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम आयोजित केला आहे.

श्री मलिक 25 जुन रोजी दुपारी 2.00 वा. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील कोविड 19, धान खरेदी, मानसुन पुर्व व महत्वाच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित राहतील.दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद , दुपारी 4.00 वा.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा खनिज प्रतिश्ठान समितीची बैठकीत उपस्थित राहणार. श्री मलिक 26 जुन 2021 रोजी दुपारी 12.00 तिरोडा येथे पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील अधिकाऱ्या सोबत आढावा,दुपारी 1.00 वा. कुंभारे लाॅन तिरोडा येथे पक्ष पदाधिकाऱ्यां सोबत बैठक, दुपारी 4.00 वा. भंडारा येथे पक्ष पदाधिकाऱ्यां सोबत बैठकीत उपस्थित राहणार.

श्री नवाब मलिक यांच्या सोबत माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे, आमदार श्री राजुभाउ कारेमोरे ,गोंदिया जिला अध्यक्ष श्री विजय शिवणकर, माजी मंत्री श्री नाना पंचबुध्दे व गोंदिया/भंडारा जिल्हयातील पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार. पक्षातील आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्याने पदाधिकारी व कार्यकर्तांना उपस्थित राहण्याची आव्हान राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेले आहे.

Related posts