गोंदिया: स्व.विलासराव देशमुख हे एक कल्याणकारी लोकनेते- डॉ. एन.डी. किरसान

98 Views

प्रतिनिधि। 27 मे

गोंदिया। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांची जयंती दिनांक २६ मे २०२१ रोजी स्थानिक शहिद भोला काँग्रेस भवन येथे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी व्दारे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान यांचे अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व अभिवादन करुन साजरी करण्यांत आली.

स्व. विलासराव देशमुख हे लोकाभिमुख कल्याणकारी नेते होते; त्यांच्या मृदू व नेहमी हसरा स्वभाव मन भेदून जात होता. लोकल्याणाच्या कोणत्याही बाबी साठी कधि त्यांनी नाही म्हटले नाही. महाराष्ट्राला सतत दोन वेळा लाभलेले ते मुख्यमंत्री होते. नंतर त्यांची निवड राज्यसभेवर झाली . व केंद्र सरकार मध्ये सुध्दा केंद्रिय मंत्री म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्राला लाभलेला हा एक दूरदृष्टी असलेला नेता ज्यांनी आपल्या राजकिय जिवनाची सुरुवात सरपंच पदापासून केली नेहमी आमच्या स्मरणात राहील असे प्रतिपादन या प्रसंगी डॉ. एन. डी. किरसान यांनी केले.

या निमित्त उपस्थित पदाधिकार्यांनी स्व. विलासराव देशमुख यानां अभिवादन करून त्यांचे राजकीय व सामाजिक जीवनवर आपले मत मांडले.

सदर कार्यक्रमास काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, काँग्रेस युवा नेते अशोक ( गप्पु ) गुप्ता, जहिर अहमद, सुर्यप्रकाश भगत, परवेज बेंग , निलम हलमारे, राजीव ठकरले , गंगाराम बावणकर , पप्पु पटले, पवन नागदवने, पंकज पिल्ले, व ईतर पदाधिकारी, हजर राहून स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन केले .

Related posts