गोंदिया: कंत्राटी कनिष्ठ अभियंता पंस, गोंदिया ओमप्रकाश डहाट यांना लाच रक्कम स्विकारल्या प्रकरणी ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

531 Views

 

प्रतिनिधि
गोंदिया। आरोपी ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट, वय ४८ वर्षे, कंत्राटी कनिष्ठ अभियंता (पॅनल तांत्रीक अधिकारी), पंचायत समिती गोंदिया रा. धामनगाव, पो. सतोना, ता. जि. गोंदिया यांनी आपले पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट व गैर मार्गाने एम.आर. ई.जी. एस. योजने
अंतर्गत तक्रारदाराच्या विहीर बांधकामाचे बिल तयार करून देण्याकरीता त्यांच्याकडे रू. १५००/- लाच रकमेची मागणी करुन ती लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली होती.

त्यावरून त्यांचेविरूध्द दि. ०७.०८.२०१५ रोजी पो.स्टे. गोंदिया ( शहर) येथे अप. क्र. ३०८६/ २०१५ कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३(२) ला.प्र.कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती आरोपीविरुध्द मा. विशेष न्यायालय, ला.प्र.का.
गोंदिया येथे दोषारोपपत्र दाखल कर वि.ख.क् ३५/२०१५, दि. १८.११.२०१५ अन्वये प्रकरण न्यायप्रविष्ट होते.

प्रस्तुत प्रकरणाच्या सुनावणीअंती मा, श्री. उदय बी. शुक्ला, विशेष न्यायाधिश, ला.प्र.का गोंदिया यांनी आज दि. ३०.०३.२०२१ रोजी आरोपी श्री ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट यांना ला.प्र.का. च्या कलम ७ मधील अपराधाकरीता ४ वर्ष सश्रम कारावास व रू. ५,०००/- दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास तसेच ला.प्र.का. च्या
कलम १३ (१)(ड) मधील अपराधाकरीता ४ वर्ष सश्रम कारावास व रू. ५,०००/- दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

प्रस्तुत प्रकरणाचा तपास श्री दिलीप वाढणकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., गोंदिया यांनी पुर्ण करुन मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाचे वतीने अॅड. श्री कैलाश खंडेलवाल, शासकीय अभियोक्ता यांनी काम पाहिले व त्यांना श्री रमाकांत कोकाटे, पोलीस उपअधिक्षक, पोहवा. प्रदिप तुळसकर ला प्र.वि. , गोंदिया यांनी सहाय्य केले.

नागरिकांना आव्हान करण्यात येते की, त्यांची लोकसेवका विरुध्द तक्रार असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे खालील माध्यमाद्वारे संपर्क करावा. त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात येईल.
पोलीस उपअधीक्षक
Toll Free No :- 1064
Helpline No :- 9168214101
Landline No :- 07182/251203
ate
Whatsapp No:- 9930997700
Website
(रमाकांत कोकाटे)
पोलीस उपअधिक्षक,
:- www.acbmaharashtrage
Mobile App :- www.maharashtra.net
Facebook Page :- www.facebook.com/Maharashtra
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया

Related posts