भाजप चे शासन व्यापारीयांचे हिताचे रक्षण करित आहे, हे शासन शेतकरी विरोधी: खा. प्रफुल पटेल

279 Views

भाजप चे शासन व्यापारीयांचे हिताचे रक्षण करित आहे, हे शासन शेतकरी विरोधी: खा. प्रफुल पटेल

प्रतिनिधि।

भंडारा। पवनी कृषि उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या धान्य गोडावुन चे लोकार्पण आज खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी माजी राज्यमंत्री श्री विलासराव श्रृंगारपवार होते व प्रमुख अतिथी म्हणून जिला अध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुध्दे, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजु कोरेमोरेे, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, जिला दुग्ध संघ अध्यक्ष रामलाल चौधरी उपस्थित होते.

या प्रसंगी खासदार पटेल आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की आज संपूर्ण देशात शेतकरी बांधव केंद्र शासनाच्या नवीन कृषि कायद्यांचा विरोध करित आहे. हा कायद्या संसदेत कोणतीही चर्चा न करता पास करण्यात आला. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा शोषण होणार आहे म्हणून संपूर्ण देशात या कायद्याचा विरोध होत आहे. शेतकरी बांधव पूर्वी पासून कर्जमाफी व स्वामीनाथन कमीशन ची रिपोर्ट लागु करण्याची मागणी करत आहे या उलट हे नवीन कायद्या आल्याने शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे नष्ट होणार. भाजप चे शासन व्यापारीयांचे हिताचे रक्षण करित आहे पण आम्ही शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण करित आहो . केंद्र शासनाचा धानाला 1868/- रुपये भाव असून शेतकरी या भावात संतुष्ठ नाही म्हणूनच आम्ही धानाला 700/- रुपयेचा बोनस मिळवून दिला. आमच्या शासन काळात गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले व जास्तीत जास्त निधी या प्रकल्पास मिळाली पण भाजप शासनाने या प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्प यादीतून वगळण्यात आले ज्यामुळे प्रकल्पाचे प्रलंबित कामासाठी निधीची कमतरता भासत आहे.

कार्यक्रमात प्रामुख्याने पंढरी सावरबांधे, हिरालाल खोब्रागडे, विवेकानंद कुर्झेकर, विजय सावरबांधे, लोमेश वैध, चेतन डोंगरे, मनोरथा जांभुळे, सरिता मदनकर, शैलेष मयुर, तोमेश्वर पंचभाई, रजनी मोटघरे, यादोराव भोगे, पुष्पा भुरे, किशोर पालांदुरकर, मुकेश बावनकर, मोरेश्वर बाळबुध्दे, सुनंदा मुंडल, पारबता डोंगरे, शोभना गौरशेट्टीवार, ग्यानेश्वर पंचभाई, रमेश ब्राम्हणकर, राजकुमार मेश्राम, सुनंदाताई डडमल, कुंडलीक काटेखाये, डाॅ. विजय ठक्कर, मनोज कोवासे, मायाताई चौसरे सोबत इतर मोठया संख्येत उपस्थित होते. या वेळी इतर पक्षातून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

Related posts