येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत खा. प्रफुल पटेल यांच्या निर्णयाशी खंबीरपणे उभे राहू – राजेंद्र जैन

239 Views

 

वार्ताहर।

गोंदिया। आगामी विधानसभा व नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत खासदार श्री प्रफुल पटेलजी जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी खंबीरपणे उभे राहू. संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत असतो त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या दोन्ही निवडणूक ह्या आपल्या मधूनच लढायच्या आहेत. शहरात अनेक समस्या आहेत त्या जनतेच्या निदर्शास द्या. जनतेची छोटे – मोठे कामे करा, पक्षाशी लोकांना जोडण्याचे कार्य करावे. आपसी मतभेद, हेवेदावे विसरून पक्षासाठी काम करा उमेदवार कुणीही असो त्याला निवडून आणण्याची शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यात असली पाहिजे हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा संघटन मजबूत असेल असे माजी आमदार श्री राजेंद्र जैन कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.

आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, प्रदेश सचिव श्री विनोद हरिणखेडे, जिल्हाध्यक्ष श्री प्रेम रहांगडाले, शहर अध्यक्ष श्री नानू मुदलियार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला प्रभागातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटन व विस्तार संबंधी चर्चा करण्यात आली. खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आगामी विधानसभा व नगरपरिषद निवडणुकीत संमर्पण वृत्तीने काम करण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.

श्री जैन पुढे म्हणाले की, महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी – लाडली बहन योजना, मुलींना उच्च शिक्षणात मोफत शिक्षण, एस टी बस मध्ये ५० टक्के सवलत, श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वामुळे शेतकऱ्यांच्या धानाला बोनस, गोंदिया येथे मेडिकल महाविद्यालय, गोंदिया व आसपासच्या परिसरातील जनतेला प्रवासाच्या सुविधेकरिता रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, विमान सेवा सुरु झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापाराला चालना मिळाली आहे. अनेक जन हिताची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

सर्वश्री राजेन्द्र जैन, प्रेम राहंगडाले, विनोद हरिनखेड़े, नानू मुदलियार, रफीक खान, अशोक सहारे, केतन तुरकर, विनीत सहारे, सतीश देशमुख, विनोद पंधरे, प्रेम जैस्वाल, गोपीचंद थवानी, मनोहर वालदे, राजेश दवे, तिलक पटले, विजेंद्र जैन, मृतुन्जय सिंग, राजकुमार जैन, हरगोविंद चौरसिया, रवि मुंदड़ा, संजीव राय, चंद्रकुमार चूटे, आनंद ठाकुर, विनायक खैरे, मनोज जोशी, महेश करियार, लवली होरा, जयंत कछवाह, मीनू बग्गा, मनीष कापसे, राजू भगत, नागों बंसोड़, एकनाथ वहिले, विनायक शर्मा, हरिराम आसवानी, हरबक्ष गुरनानी, संजीव बापट, सैयद इकबाल, राजेश कापसे, झनकलाल ढेकवार, राकेश डोदानी, सुनील धुवारे, बालू कोसरकर, त्रिलोक तुरकर, सौरभ जैस्वाल, दीपक मूलचंदानी, हर्षवर्धन मेश्राम, तुषार उके, शैलेश वासनिक, सुनील सहारे, अनुज जैस्वाल, भाउदास राउत, नसरूदीन अगवान, तुषार देशमुख, दीपक डोंगरे, किशन अजित, सुखराम नागवंशी, संदीप पटले, रमाकांत भगत, अमन घोडीचार, यश खोब्रागडे, श्रीकांत मेश्राम, जीतू लिल्हारे, प्रियेश मुदलियार, गौरव अग्रवाल, अभिषेक हलमारे, रोहित मेंढे, परम सिंग, अरविंद चौरसिया, निशांत दिप, हिमांशु दुबे, प्रशांत सोनपुरे, दर्पण वानखेड़े, अविनाश महावत, शरभ मिश्रा, गौरव शेंडे, बनना राव, जयपाल ठवकर, राजू पाचे, अतुल शेंडे, जगदीश हलमारे, राहुल वालदे, विकास साहू, जितेंद्र तिवारी, सुनील भागे, महेश कोठारी, अतुल दुबे, खुशाल कटरे, सोहनलाल गौतम, नीरज पटले, वामन गेडाम, नरेंद्र बेलगे सहित मोठ्या संख्येने शहरातील कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts